उस्मानाबाद/प्रतिनिधी-
येथील स्थानिक गुन्हे शाखे‘या  पथकाने चोरी‘या  तब्बल 44 दुचाकी जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस अधीक्षक राज तिलक रोशन व अपर अधीक्षक संजय पालवे यां‘या मार्गदर्शनाखाली मागील अनेक वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई केली असून चोरीतील बहुतांश दुचाकी पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर जिल्ह्यातील आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून दुचाकी चोरी‘या घटना वाढल्या होत्या. याचा शोध सुरू असतानाच बाहेर जिल्ह्यातून चोरलेल्या दुचाकींची जिल्हा व परिसरात विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. तसेच यामध्ये चोरट्यांची साखळीच कार्यरत असल्याचाही सुगावा लागला. त्यानुसार पोलिस अधीक्षक राज तिलक रोशन, अपर अधीक्षक संजय पालवे यां‘या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक डी. एम. शेख व उपनिरीक्षक पी. व्ही. माने यां‘या नेतृत्वाखालील पथकाने या टोळीचा व चोरी‘या वाहनांचा छडा लावण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. याकरीता दोन-चार दिवस नव्हे तर तब्बल तीन महिने संशयीतांवर नजर ठेवून तसेच त्यांचा पाठलाग करून एका आरोपीवरून सुरू झालेला तपास तीघा संशयीतापर्यंत पोहचला. त्यानंतर चार दिवसांपूर्वी अभियांत्रीकी महाविद्यालयाजवळील एका घरातून शंकर भरत देवकुळे व त्याचा सहकारी अनिल उर्फ विठ्ठल अर्जुन मगर (दोघे रा. फकिरानगर, उस्मानाबाद) यांना ताब्यात घेऊन त्यां‘याकडून चार ते पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यानंतर एलसीबी‘या पथकाने मागील चार दिवसांत रात्रंदिवस वरील आरोपीं‘या माहितीवरून उस्मानाबाद जिल्ह्यासह शेजार‘या जिल्ह्यात शोधमोहीम राबवून चोरी‘या विक्री झालेल्या तब्बल 44 दुचाकी जप्त केल्या.
 या कारवाईत एलसीबीचे पोनि शेख यां‘यासह उपनिरीक्षक पी. व्ही.माने, कर्मचारी पोहेकॉ - जगताप, पोना- शेळके, चव्हाण, दहिहंडे, कावरे, पोकॉ- सावंत, लाव्हरे पाटील, अशमोड, आरसेवाड, मरलापल्ले आदीं‘या पथकाने केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाणे अयेथे सदरील चोरट्यांवर भा. दं. वि. कलम - &79, 411, 41&, 414, 465, 468, 471, 47&, 474, 476, 482, 485, 486, 420 प्रमाणे पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद थोरात यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरवरून गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक पांडुरंग माने हे करत आहेत.

 
Top