तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील एका शेतक-याने चोरी केल्याचा आरोप करून पोलिस कर्मचा-यांकडून होत असलेल्या सततच्या पैशाच्या मागणीमुळे तसेच गुन्ह्यात अडकावण्याच्या धमकीमुळे त्रासून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.14) रात्री उशिरा घडली. यामुळे संतप्त नातलग व ग्रामस्थांनी याप्रकरणातील दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मृतदेह खाली न उतरवू देण्याचा निर्णय घेतल्याने तब्बल 19 तास मृतदेह खोलीतच लटकलेला होता.
तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील शेतकरी रंगराव अंबादास पाटील-कोळेकर (53) यांना गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी एक शेळी सापडली होती. सदरील शेळी एक महिन्यापूर्वी मुळ मालकाचा तपास लागल्यावर कोळेकर यांनी परतही केली. मात्र, शेळी चोरी गेली अथवा हरवली या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाणे येथे कुणाची ही तक्रार अथवा गुन्हा दाखल नसताना तुळजापूर पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल गौतम शिंदे व राठोड यांनी रंगराव पाटील-कोळेकर यांना तुम्ही शेळीची चोरी केली असुन या प्रकरणी तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगत धमकावत होते. त्यानंतर त्यांना हेड कॉन्स्टेबल शिंदे व राठोड यांनी पोलिस ठाण्यात हजर व्हा अन्यथा दहा ते वीस हजार रुपये द्या अशी मागणी केल्याची तक्रार जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना केलेल्या तक्रारीत नमूद केली आहे. या नाहक त्रासाला व बदनामीच्या भीतीपोटी रंगराव अंबादास पाटील-कोळेकर यांनी दि. 14 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संतप्त मोर्डा ग्रामस्थांनी शनिवारी सकाळीपासुन गाव बंद ठेवत रंगराव कोळेकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे व या प्रकरणास कारणीभूत असलेल्या पोलिस कर्मचारी गौतम शिंदे व राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सकाळीपासून पोलिस ठाण्यात तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालय गाठत दोन तास ठिय्या मांडुन आंदोलन केले. यावेळी एसपींनी कार्यवाही करण्याचे अश्वासन दिले.