परंडा/ प्रतिनिधी -
 परंडा तालुक्यातील मौजे भोंजा हवेली येथे दि.25 बुधवार रोजी तुती लागवड नर्सरी पुर्व प्रशिक्षण जिल्हा रेशीम कार्यालय उस्मानाबाद अंतर्गत तुती रोपे तयार करण्यासाठी महत्वाच्या बाबी तालुका कार्यक्षेञ अधिकारी एम.जे.गवडं व आर.व्ही येदें यांनी उद्योजक शेतकरी विकास रणनवरे यांच्या शेतात भेट दिली, यावेळी पाचपिंपळा, कुभेंजा, भोंजा, कुंभेफळ या गावातील रेशीम उद्योग करणारे ईच्छुक शेतकरी यांना प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी उपस्थित तालुका कार्यक्षेञ अधिकारी एम.जे.गवडं, ता.पा.अ. आर.व्ही. येदें, उमेद चे लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, उद्योजक विठ्ठल तिपाले, उद्योजक विकास रणनवरे, अॅड. लक्ष्मण कोकाटे, चेअरमन धनाजी खैरे, घनश्याम नलवडे, शिवाजीराव खैरे, मोहन थोरात, नानासाहेब टमटमे, विक्रमसिंह नेटके, रघुनाथ मांजरे, बबन काशीद, बालाजी मोरे, संदीप मोरे व मोठ्या संख्येने  शेतकरी  उपस्थित होते.

 
Top