तुळजापूर/ प्रतिनिधी-
जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश पुरुषोत्तम वडगावकर  यांनी केले.
तालुक्यातील काटी येथे  मंगळवार दि. 25 रोजी सकाळी  दहा वाजता  जिल्हा परिषद प्रशाला काटी येथे ग्रामपंचायत, व ग्रामस्थांच्या वतीने  काटी गांवचे माजी विद्यार्थी व सध्या भारतातील  रसायन शास्त्रातील अग्रगण्य असलेली  संस्था नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) पुणे, येथे मानद शास्त्रज्ञ  म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रकाश पुरुषोत्तम वडगावकर  यांचा  भव्य नागरी सत्कार करण्यात आला.  यावेळी ते बोलत होते.  प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी व डॉ. वडगावकर, डॉ. जयसिंगराव देशमुख,प्रा. शंकरराव साळुंके माजी सरपंच बापुसाहेब देशमुख, गटशिक्षणाधिकारी जाधव यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती कै. डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयसिंगराव देशमुख  यांनी केले.
कार्यक्रमास माजी सरपंच बापुसाहेब देशमुख, प्रा. शंकरराव साळुंके, अॅड. अविनाश देशमुख, गटविकास अधिकारी जाधव, बाबुराव ढगे, नारायण कुळकर्णी, के.डी. कुलकर्णी , मुख्याध्यापिका  सौ.विजया पाटील, संगमनेरकर दादा, मु.अ. संजय जाधव, विक्रम देशमुख, सयाजीराव देशमुख,  सरपंच आदेश कोळी, प्रदीप साळुंके, प.स.सदस्य रामहरी थोरबोले, पत्रकार उमाजी गायकवाड,  रविंद्र देशमुख, अतुल सराफ, सुजित हंगरगेकर, अशोक जाधव, मकरंद देशमुख, बाळासाहेब भाले, सुहास साळुंके, अनिल गुंड, जयाजी देशमुख, हितेश देशमुख, अविनाश वाडकर, संजय महापुरे, भिवा सोनवणे, शामराव आगलावे, नजीब काझी, रावसाहेब देशमुख, प्रा. भारत गुरव, प्रकाश पांगे, दत्तात्रय सोनवणे  आदीसह ग्रामस्थ, शिक्षक,  कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भालेराव सर यांनी केले तर आभार रविंद्र  देशमुख सर मानले .

 
Top