
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतक-यांना 2017 - 2018 मधील हरभरा व तूरीचे वाटप करण्यास शिल्लक राहिलेले एक कोटी 84 लाख रुपये अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे.
हरभरा व तूरीसाठी आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत एक हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान शासनाने मंजूर केले होते. अनुदान मंजूर झालेल्या एकूण 1860 पैकी 1503 शेतक-
यांना बँक खात्याशी आधार लिंक नसल्या रक्कम वितरित झालेली नव्हती. खासदार राजेनिंबाळकर यांच्याकडे शेतक-यांच्या तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालकांना पत्र देऊन पाठपुरावा सुरू केला. तसेच आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी दि. 11 फेब्रुवारी रोजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन तात्काळ अनुदान मिळण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने व्यवस्थापकीय संचालकांनी दि. 13 फेब्रुवारीला जिल्ह्याचे एक कोटी 86 लाख 94 हजार 800 रुपये वितरणाचे पत्र देऊन अनुदान थेट शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले आहेत.