कळंब/प्रतिनिधी-
 महापुरुषांचे विचारच समाजाचे रक्षण करू शकतात. माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे यासाठीच महापुरुषांनी काम करून समाज घडवला पण सद्या महापुरुषांचे विचार संपुष्टात येत आहेत. महिलांनी उपवास, वृत्तकैवल्य न करता महापुरुषांची चरित्रे वाचावीत असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवव्याख्याते संदीप कदम यांनी केले.
शिवसेवा तालीम संघाच्या वतीने आयोजित कै. नरसिंग आण्णा जाधव विचारपीठावरील व्याख्यानमालेत  संदीप कदम  "छत्रपती शिवराय आणि आजचा समाज" या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. विचारपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विजेंद्र आण्णा जाधव, पि. एस.आय अशोक पवार, रोटरी क्लब चे अध्यक्ष हर्षद अंबुरे, दोस्ती ग्रुप चे श्रीराम काळे, शिवदत्त मॉर्निंग योगा ग्रुप चे अशोक चोंदे, कथले युवक आघाडीचे बाळासाहेब कथले, नगरसेवक अमर गायकवाड , सतीश टोणगे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष डॉ.नंदकिशोर मोरे, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत हुलजुते, डॉ.रुपेश कवडे, अतुल कवडे, प्रताप मोरे, उपस्थित होते.
व्यख्यानमालेचे सूत्रसंचालन सागर बाराते, प्रास्ताविक प्रा.जगदीश गवळी तर आभार प्रताप मोरे यांनी मानले.

 
Top