तुळजापूर /प्रतिनिधी-
राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नही, याच्या निषेधात  उद्या मंगळवार दि.२५ रोजी भाजपाच्या वतीने जिल्हयातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.  या आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन  भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी रविवारी तुळजापूर येथे  आयोजित  तालुक्यातील पदाधिकाय-याच्या  बैठकीत केले.
 यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्मिता कांबळे , माजी जिल्हाध्यक्ष दत्ता  कुलकर्णी, उपाध्यक्ष मीनाताई सोमाजी,  जिल्हा सरचिटणीस दत्ताभाऊ मुळे, कोषाध्यक्ष नागेश नाईक, नगरसेवक सचिन पाटील, माऊली भोसले, शहराध्यक्ष सुहास साळुंखे, बबन सोनवणे, संजय खुरूद, गुरुनाथ बडूरे, इंद्रजीत साळुंखे, प्रसाद पानपुडे, विश्वजीत पाटील, शांताराम पेदे तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी व गणातील पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

 
Top