उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद येथे वकील व्हॉलीबॉल संघातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नगराध्यक्ष चषक व्हॉलीबॉल स्पर्धेत अत्यंत अतितटीच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या संघाने येडशीच्या संघावर विजय साकारत पहिल्या नगराध्यक्ष चषकावर आपले नाव कोरले. रोख 31 हजार रुपये व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते जेजुरीच्या संघाचा सन्मान करण्यात आला.
उस्मानाबादेत पार पडलेल्या राज्यस्तरीय नगराध्यक्ष चषक व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्यभरातून 45 संघांनी सहभाग नोंदविला. यामध्ये आपआपल्या गटातून विजय साकारत जेजुरी व येडशीचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला. अत्यंत अटीतटीच्या व क्षणाक्षणाला उत्कठा वाढविणाऱ्या या अंतिम सामन्यात शेवटच्या टप्प्यात जेजुरीच्या संघाने येडशीवर विजय साकारत चषकावर आपले नाव कोरले.
या विजयानंतर जेजुरीच्या संघास नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शिवसेना सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. नितीन भोसले, पालिकेतील गटनेते युवराज नळे, प्रगती पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, अॅड. कैलास बागल, माजी नगरसेवक अॅड. दर्शन कोळगे, युवराज राजेनिंबाळकर, बालाजी कोरे आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरन करण्यात आले. तर उपविजेत्या येडशीच्या संघास 21 हजार रुपये व चषक देण्यात आला. या स्पर्धेला शहर व परिसरातील हजारो नागरिकांनी हजेरी लावत प्रतिसाद दिला.