जिल्ह्यातील 10 शाळांची निवड ; दोन शिक्षकांचा ‘इकोगुरू-वसुंधरा रक्षक’ पुरस्काराने सन्मान
उस्मानाबाद/प्रतिनिधी -
पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या 95 व्या
जयंतीनिमित्त वनराई संस्थेच्या वतीने पुणे येथे घेण्यात आलेल्या आंतरशालेय वार्षिक स्पर्धेत उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील शाळांमधील विद्याथ्र्यानी चित्रकला व निबंध स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. तर दोन शिक्षकांचा ‘इकोगुरू-वसुंधरा रक्षक’ पुरस्कार देऊन संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
वनराई पर्यावरण वाहिनी या संस्थेच्या वतीने पर्यावरणविषयक उपक्रमांना चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. याअंतर्गत पद्मविभूषण डॉ.मोहन धारिया यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्रातील शालेय विद्याथ्र्यांसाठी आंतरशालेय वार्षिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील 10 शाळांनी सहभाग नोंदवला होता. निबंध स्पर्धेत पाचवी ते सातवी गटातून शीतल संजय जाधव (प्रथम), सानिया हबीब शेख (द्वितीय), श्रुती दिगंबर मोकाशे (तृतीय), अमृता संतोष विधाते, अक्षय बाळासाहेब भांगे (उत्तेजनार्थ) तर आठवी ते दहावी गटातून प्रिया दामोदर वाघमारे (प्रथम), प्रज्ञा नामदेव कोकाटे (द्वितीय), पायल विनोद साबळे (तृतीय), स्नेहल सतीश शेळके व पायल महावीर गायकवाड यांनी उत्तेजनार्थ क्रक्रमांक पटकावला.
चित्रकला स्पर्धेत पाचवी ते सातवी गटातून प्रज्ञा पद्माकर लोमटे (प्रथम), सानिका बबन शेळके (द्वितीय), प्रमोदिनी बालाजी महाडीक (तृतीय), आदिती रामराजे जाधव व महेश मोहन शेंडगे (उत्तेजनार्थ), आठवी ते दहावी गटातून दिव्या परमेश्वर सावंत (प्रथम), अश्विनी अशोक कांबळे (द्वितीय), भक्ती अनंत देशमाने (तृतीय) तर पूनम नवनाथ मडके व हर्षवर्धन हेमंत जगदाळे (उत्तेजनार्थ) यांनी यश संपादन केले.
तसेच मोहा (ता.कळंब) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक सचिन नवनाथ चांदणे व उस्मानाबाद  येथील धीरूभाई अंबानी विद्यालयाचे सहशिक्षक अमोल हनुमंत सारडे यांना संस्थेच्या वतीने ‘इकोगुरू-वसुंधरा रक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. परीक्षा परिषदेचे सहायक उपायुक्त अनिल गुंजाळ, माजी आमदार उल्हास पवार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे, वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया व प्रकल्प संचालक भारत साबळे, वृषाली नामपूरकर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन शिक्षकांसह विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. 
 
Top