उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 आयकर विभागाच्या उस्मानाबाद कार्यालय, कर सल्लागार असोसिएशन आणि व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करदात्यांशी संवाद’ ही कार्यशाळा शहरातील आयकर कार्यालयात बुधवार, 27 फेब्रुवारी रोजी पार पडली. या कार्यशाळेस करदात्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.                कार्यशाळेस आयकर अधिकारी विशाल कुमार, आनंद ओहोळ व आयकर निरीक्षक व्यंकटेश मते यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी व्यापारी व उद्योजकांनी आपल्या कराचा भरणा वेळेवर करावा, असे आवाहन केले. मिळणार्‍या कररूपी महसुलातून देशाचा विकास होत असतो. त्यामुळे कर भरणे सर्वांचे दायित्व आहे. केंद्र सरकारने आयकरात अनेक सवलती दिल्या आहेत. त्याचा करदात्यांनी लाभ घ्यावा, असेही यावेळी मान्यवरांनी सांगितले.
कार्यशाळेत अग्रीम कराबाबतही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. अग्रीम कर भरण्याच्या एका वर्षातून 4 मुदती आहेत. 15 जून, 15 सप्टेंबर, 15 डिसेंबर व 15 मार्च. या आधी वषार्र्तून तीनवेळा अग्रीम कराचा भरणा करावा लागत होता. आता तो चारवेळा भरता येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या अग्रीम कराचा भरणा मुदतीपूर्वी करावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व सनदी लेखापाल, आयकर सल्लागार, वकिल, व्यापारी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top