कळंब/प्रतिनिधी-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त सकल शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने कळंब येथे सोमवारी (दि.17) सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरात सलग चौथ्या वर्षी शिवजन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे. शहरातील उपजिल्हारुग्णालयात हे शिबीर होणार आहे. शहराच्या इतिहासात असे मोठे रक्तदान 4 वर्षापासून होत असून यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवजन्मोत्सवानिमित्त यावर्षी 1001 रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे. यात शहर व परिसरातील नागरिकांसह 56 संघटनांचा सहभाग असणार आहे. यावेळी अवयवदान शिबीर देखील आयोजित केले आहे. नागरिकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top