कळंब/प्रतिनिधी-
स्त्रीला गर्भातच संपवून टाकायचं ही मानसिकता संपायला पाहिजे. लखुजीराजे नी जिजाऊ ना दिलेल्या संस्कारामुळेच छ.शिवाजीराजे घडले असेच संस्कार प्रत्येक पालकांनी मुलांना दिले पाहिजेत. शिवरायांनी नेहमीच महिलांचा आदर करून कष्टकरी महिलांना नेतृत्व करण्याची संधी दिली, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवव्याख्यात्या अँड.वैशालीताई डोळस यांनी केले.
कळंब येथील शिवसेवा तालीम संघाच्या वतीने शिवजन्मोत्सव व्याख्यानमालेचे कै. नरसिंग जाधव विचारपीठावर तिसरे पुष्प अँड.वैशालिताई डोळस यांनी "जिजाऊ-छत्रपती शिवराय" या विषयावर गुंफले. व्यख्यानाच्या सुरुवातीस विचारपीठावर उपजिल्हाधिकारी सौ.अहिल्या गाठाळ-होळे,  सौ मीरा ताई चोंदे सौ.सुनंदाताई कापसे, सौ.धनश्री कवडे, सौ.रेखा चौधरी, अँड.शकुंतला फाटक, सौ.अलका टोणगे, सौ.राजेश्री देशमुख, सौ.सरला सरवदे, सौ.सुरेखा पारख, सौ.अश्विनी शिंदे, सौ.उषा कवडे, शफुरा शकील काझी,सौ मोहिनी हुळजूटे यांच्या हस्ते छ. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बालव्याख्याते सोमनाथ काथमांडे , कु.तनिष्का मगर , रितेश कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला.
  यावेळी उपविभागीय अधिकारी सौ.अहिल्या गाठाळ-होळे यांनी ही आपले विचार सर्वांपुढे मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिजाऊ वंदना घेण्यात आली. सूत्रसंचलन प्रा.मनीषा कळसकर तर आभार सौ.अलका टोणगे यांनी मानले. राष्ट्रगीताने व्याख्यानाची सांगता करण्यात आली.

 
Top