लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील व तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध सामाजिक प्रबोधन कार्यक्रम राबवुन साजरी करावी, असे आवाहान, पोलीस उपविभागीय अधिकारी अनुराधा उदमले यांनी केले.
 लोहारा तालुक्यात जातीय सलोखा, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी, यासाठी शहरातील पोलीस ठाण्यात तालुकास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अनुराधा उदमले बोलत होत्या. यावेळी सहाय्यक पो.नि.अशोक चौरे, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, दिपक मुळे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक बाळासाहेब कोरे, नगरसेवक गगन माळवदकर, जिल्हा शांतता समिती सदस्य इकबाल मुल्ला, भाजपा शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, कुर्बान खुटेपड, गोपनीय विभागाचे पो.हे.कॉ. पोपट क्षीरसागर, यांच्यासह महावितरण कार्यालयाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, नगरपंचायतचे पदाधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top