उस्मानाबाद/प्रतिनिधी-
ग्रामीण भागातील शेतक-यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा मागणी सोबत अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीन  निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कंदील भेट देऊन शासनाचा निषेध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माजी जिल्हा अध्यक्ष अमरराजे कदम, जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
उस्मानाबाद-जिल्हातील शेतक-यांना राञी-मध्यराञी महावितरण कंपनी वीजपुरवठा करते, त्यामुळे शेतक-यांना जीव मुठीत धरून मध्यराञी शेताला पाणी देण्यासाठी जावे लागते,  यामुळे शेतकरी परेशान झाले आहेत. ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडीत केला जातो तो सुरळीत करण्यात यावा,ग्रामीण भागातील शेतक-यांना नवीन विज कनेक्शन दिले जात नाही हजारो शेतक-यांनी नवीन कनेक्शन मिळावे यासाठी महावितरण कंपनी कडे अर्जाद्वारे मागणी केली आहे पण महावितरण कंपनीचे अधिकारी नवीन कनेक्शन देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत, अशा अधिका-यावर प्रशासकीय कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कोठावळे, दत्ता घोगरे, मुरली देशमुख, धर्मराज सावंत, पवनराजे वर्पे, दयानंद कांबळे, सलीम आवटी, प्रमोद कदम, वेदमुमार पेंदे, मेघनाथ खवले, गणेश वाकुरे, सुरज कोठावळे, उमेश कांबळे, अक्षय साळवे, नारायण सांळुके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत.

 
Top