उस्मानाबाद/प्रतिनिधी-
वर्धा जिल्हयातील हिंगणघाट व औरंगाबाद जिल्हयातील सिल्लोड तालुक्यातील अंधारीगाव तसेच मुंबई जवळील कश्मिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटलेल्या अत्याचाराच्या घटनेचा जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या वतीने निषेध करण्यात आला. त्यानंतर आपल्या विविध मान्याचे निवेदन शुक्रवार ७ फेबु्रवारी जिल्हाधिका-यांना देण्यात आले.
जिल्हाधिका-यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महिलांवर होणा-या अमानुष अत्याचाराच्या घटना जलदगती न्यायालयात चालविले जावे व त्या अनुषंगाने आरोपींना झालेल्या शिक्षांची तात्काळ अंमलबजावणी करावी, जिल्हयातील शाळा व महाविद्यालयामध्ये सुरक्षा योजना सुरू करावी तसेच महिलांच्या संरक्षणासाठी कठोर निर्णय व कडक कायदे करावे, आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याची मांगणी करण्यात आली आहे. यावेळी अॅड. ज्योती बडेकर, अॅड. अरूणा गवई, अॅड. सारिका मुंडे, अॅड. अश्विनी सोनटक्के, अॅड. भाग्यश्री कदम, अॅड.  प्रतिभ नेरे, अॅड. फातिमा कबिर, अॅड. तेजस्वीनी पाटील, अॅड. अर्चना डोरनाळीकर, अॅड. सबा सय्यद, अॅड. वैशाली देशमुख, अॅड. राणी मैंदाड, अॅड. राधा चव्हाण, अॅड. राजश्री कोळगे, अॅड. माधवी उंबरे, अॅड.  आशा टेळे व  महिला विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 
Top