कळंब/प्रतिनिधी-
सध्या स्पर्धेचे युग आहे, या युगात संगणक ज्ञानाला विशेष महत्व आहे, असे प्रतिपादन प्रा. विशाल गरड यांनी केले.    कळंब येथील सुसज्ज अशा अँप्टेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरला प्रा. गरड यांनी भेट  दिली. त्यावेळी ते विद्याथ्र्यां समवेत बोलत होते.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष शाम नाना खबाले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.नगराध्यक्ष शिवाजी कापसे उपस्थित होते.प्रास्ताविक अँप्टेक कॉम्प्युटर एज्युकेशन चे संचालक संजय घुले यांनी केले. अँप्टेक च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे आभार संचालक संजय घुले यांनी मानले.
 
Top