तुळजापूर/प्रतिनिधी-
 शेतक-यांसाठी दिवसा वीजपुर्ती करावी  व सातबारा कोरा करावा या मागणीसाठी  स्वाभीमानी शेतकरी संघटना लवकरच मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे प्रतिपादन  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केले.
शहरातील पुजारी मंडळ मंगल कार्यालयात आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, विनायक पाटील, घनश्याम चौधरी, अमोलजी हिपरगे,  अँड विजय जाधव, शिवाजी पाटील, राजामामा भोसले, जालींदर पाटील, गजाजन बंगाले -पाटील, सत्तार पटेल, बापुसाहेब कारंडे, गोरखजी मोरे, विजय जाधव  धर्मराज पाटील  आदी नेते उपस्थितीत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना  शेट्टी म्हणाले की, महाविकास आघाडीने सात-बारा कोरा करण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही , सत्ताधा-यांनी नागपूर अधिवेशनात केलेली कर्जमाफी   बिनकामाची असल्याचा आरोप केला. मुबलक वीज उपलब्ध असताना जाणीवपूर्वक शेतक-यांनी कमी वीज वापरावी म्हणून  राञी शेतक-यांना वीज दिले जाते,असा  आरोप यावेळी केला.खरेदी केंद्रा ऐवजी शेतक-यांच्या पावत्या घेवुन हमी भावाच्या फरकाचे पैसे शेतक-यांना दिले तर कृषी क्षेत्रातील भ्रष्ट्राचार थांबेल, असे यावेळी स्पष्ट केले.प्रारंभी प्रास्तविक जिल्हाध्यक्ष रविंद्रइंगळे यांनी केले तर  आभार धनाजी पेंदे यांनी मानले .यावेळी  नुतन पदाधिकारींना निवडीचे पञ दिले.
शेतकरी पुञाला राग आलातरच क्रांती होईल -तुपकर 
रविकांत तुपकर म्हणाले की, आज आम्ही देविला साकडे घातले की, शेतक-यांना कर्जमुक्त कर आपणास मोजक्या कार्यकत्र्यांच्या जीवावर शेतकरी चळवळ यशस्वी करायाची आहे. गर्वसे कहो हम किसानोंके बेटे हे औलाद आहे असे आपण अभिमानाने म्हटलं पाहिजे. मोदी म्हणतात शेतक-यांना उत्पन्न वाढवा पण त्यांचे उत्पन्न वाढवा, असे म्हणत नाही .ज्यांनी शेतकरी बापाला आत्महत्या करण्याची वेळ आणली अशांना झेंड्यांचा दांडाने हाणले पाहिजे, असे म्हणाले
 
Top