उस्मानाबाद/प्रतिनिधी -
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२० ते २०२५ च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये अरविंद गोरे यांनी दणदणीत विजय मिळवला. गोरे यांच्या पॅनल ने अॅड. व्यंकट गुंड यांच्या पॅनलचा १ हजार ते १६०० मताच्या फरकाने दारूण पराभव केला.२१ संचालक मंडळा पैकी २ संचालक गोरे दादा पॅनलचे बिनविरोध निवडून आले होते. तर १९ जागेसाठी ही निवडणुक झाली आहे.
३९ कोटी रूपयांमध्ये उभारलेल्या आंबेडकर कारखान्यावर २४७ कोटी रूपयांचे कर्ज कसे झाले, हा प्रमुख मुद्दा घेऊन अॅड. गुंड यांच्या पॅनलने ही निवडणुक लढवली तर कारखान्याचे संस्थापक विद्यमान चेअरमन अरविंद गोरे यांनी या निवडणुकीत कसलाही प्रचार किंवा सभासदांची गाठीभेटी, पोलचिठ, बॅनरबाजी यावर खर्च न करता फक्त एकच प्रश्न सभासदासमोर ठेवला आंबेडकर कारखान्याचा तेरणा कारखाना होऊ द्यायचा का ? त्यामुळे सभासद शेतक-यांनी झाडून अरविंद गोरे यांच्या पॅनला मतदान केले. या निवडणुकीत ३७२९ मतदान होऊन ९० टक्के मतदान झाले होते.२१ उमेदवारापैंकी अतुलसिंग बायस व चित्राव गोरे हे गोरे पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडूण आले हेाते.
गोरे पॅनलचे विजयी उमेदवार
अरविंद गोरे, लिंबराज लोकरे, हणमंत काळे, फत्तेसिंह देशमुख, नामदेव पाटील, दिलीप गणेश, निलेश पाटील, शंकर सुरवसे, राजेश पाटील, अभिजीत माने, कूंद पाटील, ज्ञानेश्वर बाकले, शिवाजीराव नाईकवाडी, अविनाश हावूळ, आयबखान पठाण, चित्राव गोरे, सुग्रीव कांबळे, वर्षा राजेंद्र पाटील, अश्विनी अशोक पाटील, हनुमंत भुसारे, अतुलसिंग बायस हे उमेदवार विजयी झाले. गोरे पॅनलचे सर्व उमेदवार २५०० ते २६५० मते घेऊन विजयी झाले.
गुंड पॅनलचा चौथ्यांदा पराभव 
आंबेडकर साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अॅड.व्यंकट गुंड यांच्या पॅनलचा चौथ्यांचा पराभव झाला आहे.गुंड पॅनलच्या सर्व उमेदवारांना ९०० ते ११०० मतावर समाधान मानावे लागले. या निवडणुकीमध्ये चेअरमन गोरे यांनी ज्या सभासद शेतक-यांनी ऊस घातला नाही, किंवा सभेस उपस्थित राहिले नाहीत, किंवा अन्य तांत्रिक बाबी दाखवून अनेकांचे सभासदत्व रद्द केले होते.
रूपामाताच्या मल्टीस्टेटचे अशोक पाटील यांचा सत्कार 
डॉ. आंबेडकर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीत गोरे पॅनलमधुन उभारलेल्या अश्विनी अशोक पाटील या विजयी झाल्या अश्विनी पाटील यांचे पती अॅड. व्यंकट गुंड यांच्या रूपामाता मल्टीस्टेट मध्ये व्हाईस चेअरमन आहेत. निवडणुकीनंतर अशोक पाटील यांचा खास सत्कार करण्यात आला.
 
Top