तुळजापूर/ प्रतिनिधी-
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सातत्यपूर्ण प्रयत्नातून यश हमखास मिळत असल्याचे सांगून युवकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी केले. यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही यावेळी रौशन यांनी सांगितले.
पोलिसांच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत तुळजापूर येथील पोलिस संकुलात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी साकारलेल्या "ज्ञानसाधना अभ्यासिकेच्या  उद्घाटनप्रसंगी पोलिस अधीक्षक बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिप्परसे, पोलिस निरीक्षक हर्ष गवळी, पालिकेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे, बालाजी अमाइन्सचे संचालक रेड्डी आदींची उपस्थिती होती. विद्याथ्र्यांसाठी अभ्यासिकेची सोय करण्यात आली असून स्पर्धा परीक्षेसोबतच इतर अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांनीही या अभ्यासिकेचा लाभ घेण्याचे आवाहन रौशन यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विवेक कोरे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
 तामलवाडी येथील बालाजी अमाइन्सच्या सहकार्याने अभ्यासिकेत डेस्क पुरविण्यात आले. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके, संदर्भग्रंथ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच वरीष्ठ आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाचे नियोजन करण्यात येणार आहे.
 
Top