उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तालुक्यातील बेंबळी येथील पोलीस स्टेशन मध्ये सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हाँस्पीटल्स (उस्मानाबाद) यांच्यावतीने मोफत  सर्व रोग निदान शिबीर घेण्यात आले.
यावेळी सह्याद्री हाँस्पीटल्स चे डॉ दापके - देशमुख दिग्गज, डॉ. रमेश जावळे, बेंबळी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.आय.शेख, दिनकर गोरे, अदि उपस्थित होते. पोलीस कर्मचा-यांना आरोग्याची वेळीच काळजी घेतली तर, होणा-या गंभीर आजारावर वेळीच मात करता येईल असे डॉ.दापके देशमुख यांनी सांगितले. व तसेच डॉ. रमेश जावळे यांनी निरोगी आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करुन महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेची सविस्तर माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए.बी.देवडकर यांनी केले तर आभार हाँस्पीटल्सचे समन्वयक राजेंद्र कापसे यांनी मानले. यावेळी पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top