कळंब/प्रतिनिधी-
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह कळंब येथे दि.26 जानेवारी 2020 रोजी एकदिवसीय वार्षिक कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वसतिगृहाचे ग्रहपाल पवन बरकुल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर ,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.के.डब्लू. पावडे , जाधवर कोचिंग क्लासेस चे गणेश जाधवर हे होते.
यावेळी गणेश जाधवर म्हणाले की विद्याथ्र्यांनी आयुष्याकडे सकारात्मक पहात उज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणे आवश्यक आहे. धडपड करणारया विद्याथ्र्यांसाठी शासनाने विविध योजना राबवल्या असुन त्यांचा लाभ घेत उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन त्यांनी केले.
पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी आई वडीलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून सातत्याने अभ्यास करून जिवनात यश संपादन करून आई वडीलांचे स्वप्न पुर्ण करा. मोबाईलचा सकारात्मक व नेमका वापर करणे सध्या आवश्यक असुन पुस्तक वाचनाकडे कल वाढविण्याचे अवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी प्रा पावडे यांनी ही विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. व यावेळी वसतिगृहाचे सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शिंपले यांनी केले व आभार वसतिगृहाचे प्रतिनिधी प्रदीप देवकते यांनी मानले.

 
Top