उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सोलापुर-पुणे इंटरसिटीच्या धर्तीवर लातूर-उस्मानाबाद-पुणे इंटरसिटी सुरु करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केंद्रिय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
 पुढील महिन्यात नवीन रेल्वे अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पात लातूर-उस्मानाबाद-पुणे रेल्वे दैनंदिनरीत्या सुरु करावी व या रेल्वेला उस्मानाबादसह पांगरी व बार्शी या ठिकाणी थांबे द्यावेत अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना दिल्ली येथे प्रतिनिधी मार्फत दिले आहे.
 त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे  की,उस्मानाबाद,लातूर, सोलापूर या जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी पुणे या ठिकाणी शिक्षणासाठी जातात. मात्र दैनंदिन रेल्वे नसल्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते तसेच या जिल्ह्यांमध्ये शेतकरी देखील भाजीपाला व फळे यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात मात्र त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही त्याबरोबरच आरोग्य व व्यापार या गोष्टींना देखील लातूर-उस्मानाबाद-पुणे इंटरसिटीमुळे गती मिळेल.मराठवाड्याचा विकास होण्यासाठी अशा प्रकारची रेल्वे दैनंदिनरीत्या सुरू झाल्यास अनेक गुंतवणूकदार उस्मानाबाद जिल्ह्यात येतील. ही रेल्वे सकाळी सहा वाजता लातूर येथून निघावी व साडेदहा वाजता पुणे या ठिकाणी पोहचावी त्याचबरोबर सायंकाळी सहा वाजता पुणे येथून निघावी असे वेळापत्रक केल्यास या इंटरसिटीला मोठा प्रतिसाद मिळेल

 
Top