तुळजापूर/प्रतिनिधी-
भवानी प्रतिष्ठान आयोजित शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या शिवसप्ताह सोहळ्याचा सांगता गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन  वाटप करुन  व  शिवशाहीर संतोष साळुंके यांच्या पोवाडा कार्यक्रमाने झाली.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजय निंबाळकर, डॉ. आनंद मुळे, डॉ. अभय घोलकर, महंत ईच्छागीरी महाराज, महंत वाकोजीबुवा, महंत व्यंकटअरण्य महाराज, सिद्धेश्वर ईंतुले, गोपाळ महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त हजारो शिवप्रेमींना मुर्तीचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच केंद्रीय आश्रमशाळेतील विद्याथ्र्यांना बॉयलर भेट देऊन भोजन देण्यात आले.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत नवले, धिरज कदम, आकाश चोपदार, बालाजी   पेंदे, धनाजी घोगरे, चंद्रकांत जाधव, विकास चोपदार, सोमनाथ क्षीरसागर, दिग्वीजय धुमाळ, सागर भोसले, सागर पाटील, प्रसाद पेंदे, विशाल निंबाळकर, जावेद शेख, अंबादास काकडे, विनायक सीरसट, सुरज चोपदार, सोनु भोसले, धिरज चोपदार आदींनी परिश्रम घेतले .

 
Top