उस्मानाबाद /प्रतिनिधी-
आपल्या महाराष्ट्राची राजभाषा, ही मराठी आहेच. त्याही अगोदर ती आपली मातृभाषा आहे .तिचा आभिमान मराठी भाषिक म्हणून सर्वांनाच असायला हवा तसेच न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचाच वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा.राजा जगताप यांनी केले.
कौटुंबिक न्यायालय. उस्मानाबाद येथे, दि.14 फेब्रवारी रोजी,"मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा"निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून  ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कौटुंबिक न्यायालयाच्या मा.न्यायाधीश श्रीमती अमृता अ.शिंदे मॅडम होत्या.यावेळी मा. श्री.एस.बी.तोडकर(सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद),अॅड.कोळगे मॅडम उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांनी दिप—प्रज्वलन केले. यावेळी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे मा.न्यायाधीश श्री एस.बी.तोडकरी यांनी ही मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप  कौटुंबिक न्यायालयाच्या मा.न्यायाधीश श्रीमती,अमृता अ.शिंदे  यांनी केला.
सूञसंचालन अॅड.एम.बी.माढेकर यांनी केले. प्रास्ताविक श्री.विजय गव्हाळे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विधीज्ञ,न्यायालयीन कर्मचारी ,विधी महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top