तुळजापूर /प्रतिनिधी-
तुळजापूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामार्फत विविध योजनांमधून रास्त भाव दुकानातील धान्य सतत तीन महिने न उचलणा-या शिधापत्रिकाधारकांना विविध योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला असल्याचे माहिती, तुळजापूर पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी संदीप जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पुरवठा विभागाच्या एकूण धान्य उचल पात्र कार्डं संख्या 45065 असून त्यापैकी 40357 कार्डंधाकर नियमित धान्य उचलतात परंतू 4708 इतके शिधापत्रिकाधारक नियमीत धान्य उचलत नसून अशा शिधापत्रिकाधारकांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पॉश मशिनद्वारे शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याचा ठसा घेऊन धान्य वितरीत केले जात असून यामुळे पारदर्शकता आली आहे.
विविध योजनेतून वगळलेल्या शिधापत्रिकाधारकांची शिधापत्रिका रद्द न करता त्यांना दारिद्र्यरेषे वरील यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे माहिती देण्यात आली. धान्य मिळणा-या शिधापत्रिकाधारकांनी दर महिन्याला आपले धान्य उचलावे , असे आवाहन तहसीलदार सौदागर तांदळे, पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी संदीप जाधव,पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन जी. पवार यांनी केले आहे.