तुळजापूर/प्रतिनिधी-
श्री शिवजन्मोत्सव सोहळयाानिमित्त  तुळजापूर रयतेच्या वतीने आई तुळजाभवानी महाद्वारी बुधवार दि 19  रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी बुधवारी सकाळी श्री तुळजाभवानी मातेस सिंहासन अभिषेक पुजा, मंहतांचा हस्ते छञपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची  प्रतिष्टापना, दुपारी तीन वाजता हाडको मैदानातुन भव्य शोभायाञेस प्रारंभ होणार आहे.
या यात्रेमध्ये महिलांचे ढोल पथक, लेझीम पथक, पारंपारीक वेषातील लोककला,  पिंगळी वासुदेव,  धनगरी ढोल पथक, कोल्हापूरी हलगी,  गोधळी हलगी, तुतारी,  वाघ्या मुरळी मावळे घोडेस्वार यांच्यासोबत इंजिनियर काँलेज च्या मुलीचे ढोलपथक व मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक होणार आहे. आई तुळजाभवानीच्या महाद्वारावरील मुख्य व्यासपीठावर नाशीक चे प्रसिध्द शाहीर जाधव यांच्या पोवाडयाचा कार्यक्रम होणार आहे .नंतर मुख्य नामकरण सोहळा होणार आहे, याचवेळी अन्नदान केले जाणार आहे.

 
Top