कळंब/प्रतिनिधी -
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने रविवार दि.1 मार्च रोजी कळंब मध्ये शिक्षक मेळावा व प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली आहे.
बलाई मंगल कार्यालय मोहा रोड कळंब येथे दुपारी 12 वाजता  उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या शुभहस्ते प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हापरिषदच्या अध्यक्षा  अस्मीताताई कांबळे या असणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन कळंब-उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील, जिल्हापरिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डाँ.संजय कोलते, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष धनंजय सांवत, महीला व बालकल्याण सभापती सौ.रत्नमाला टेकाळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शिक्षणाधिकारी गजानन सुसर, सभापती संगिताताई वाघे, उपसभापती गुणवंत पवार, गटविकास अधिकारी नामदेव राजगुरु, गटशिक्षणाधिकारी संजीव बागल उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत .
या कार्यक्रमात सामाजिक व शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणा-या स्वंातत्र्य सेनानी गणपतराव कथले युवक आघडी कळंब सह केंद्रिय प्राथमिक शाळा तडवडा (ता.उस्मानाबाद),प्राथमिक शाळा पिंपळगाव (लंगी) ता.वाशी , प्राथमिक शाळा भाटशिरपुरा ता.कळंब ,प्राथमिक शाळा बाभळगाव ता.कळंब व सतरा शिक्षकांना प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
तरी जिल्ह्यातील शिक्षक बंधू व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाव, असे आवाहन  शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे ,सोमनाथ टकले, एल.बी.पडवळ ,भक्तराज दिवाने , संतोष देशपांडे ,विठ्ठल माने , अर्जुन गुंजाळ ,श्रीनिवास गलांडे, रामकृष्ण मते ,सुधीर वाघमारे ,अनिल बारकुल,,राजेंद्र बिक्कड ,श्रीम अनुराधा देवळे ,  रोहीणी माने ,  जेमिनी भिंगारे ,प्रदिप म्हेत्रे भुषण नान्नजकर,पिराजी गोरे, वैशाली क्षिरसागर, राजश्री कुटे, ज्योती ढेपे यांनी केले आहे.

 
Top