परंडा/ प्रतिनिधी -
परंडा तालुक्यातील अनाळा येथील न्यू हायस्कुल शाळेतील इयत्ता 10वीच्या विद्याथ्र्यांचा निरोप समारंभ बुधवार दि.25 रोजी झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राजकुमार ससाणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपनिरिक्षक डि.डि. बनसोडे, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक एच.एस. साळुंके, केंद्र प्रमुख प्रफुल्ल झाडबुके, माजी मुख्याध्यापक पी.टि.लिमकर, माजी सरपंच तानाजी अंकुश, साजीद शेख उपस्थित होते. निरोप समारंभानिमित्त
विद्याथ्र्यांन पोलीस निरीक्षक राजकुमार ससाणे यांनी अनमोल मार्गदर्शन केले व पुढील शैक्षनिक वाटचालिस शुभेच्छा दिल्या. यावेळी इयत्ता 10 च्या विद्याथ्र्यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून सानिका लक्ष्मण रिटे हिने काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वसंत हिवरे यांनी केले. सुत्रसंचालन सचिन पाटील व जयकुमार भोरे यांनी केले तर आभार बाळासाहेब वरपे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेेसाठी विठ्ठल बल्लाळ, एम.डि. शेख, जी.ए. शेख, शरद पाटील, एस. बि.वाघमारे, डि.आर.सपकाळ , शंकर वरळे, लहू अंकुश, एस.के.पिंपळे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमास   पालक, ग्रामस्थ मोठया संंख्येने उपस्थित होते.
 
Top