जिला संवाददाता । उस्मानाबाद-
उस्मानाबाद शहरासह जिल्हयात महाविश्वरात्री मोठया भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. भाविकांनी पहाटे पासूनच उस्मानाबाद शहरातील कपीलेश्वर व महादेव मंदिर,  चोराखळी येथील पापनाश मंदिर, भंडारवाडी येथील महादेव मंदिर, वडगाव सिध्देश्वर येथील सिध्देश्वर मंदिर, उमरगा येथील महादेव, तुळजापूर येथील भवानी शंकर मंदिर कळंब तालुक्यातील पाडोळी (ना.) आदी विविध ठिकाणी मंदिरामध्ये भाविक भक्तांनी दर्शनासाठी व आभिषेक पुजेसाठी मोठी गर्दी केली होती. शिवसेनेचे उस्मानाबाद जिल्हा सहसंपर्क प्रमुख व उद्योगपती शंकरराव बोरकर यांनी सकाळी महादेव मंदिरामध्ये जावून मोठया भक्तीने पुजाअर्चा केली.
अनेक मंदिर परिसरामध्ये भाविकांच्या झालेल्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यातील भंडारवाडी, चोराखळी येथील चाकर माने पुणे-मुंबईवरून आपल्या गावी महाशिवरात्रीनिमित्त दाखील झाले होते. ग्रामीण भागात लहान मुलांसाठी खेळ व करमणुकीची साधणे पहायला मिळाली. यावेळी उस्मानाबाद शहर तसेच जिल्हयातील प्रत्येक महादेव मंदिरामध्ये शिव-शंभू, ओम नम:शिवाय, हर हर महादेव आदी जयघोषणाने दुमदुमून गेले होते. शनिवार दि.२२ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे वाटप अनेक गांवामध्ये ग्रामस्थांच्या वतीने केले जाते. उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील भंडरवाडी व पाडोळी (ना.) तसेच अन्य कांही ठिकाणी मोठया स्वरूपात महाप्रसादाचे वाटप केले जाते. 
 
Top