उमरगा/प्रतिनिधी
तालुक्यातील भिकार सांगवी साठवण तलाव पात्रात एका 35 वर्षीय युवकाचा पाण्याने सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही घटना गुरुवारी (दि.20) सकाळी बाराच्या सुमारास उघडकीस आली असून, प्राथमिक अंदाजानुसार तीन दिवसापूर्वी तरुण पाण्यात पडल्याचा अंदाज आहे. एका शेतकऱ्याच्या बांधालगत मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. ग्रामस्थांनी याची माहिती बेडगा येथील ग्रामस्थ व पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या तरुणाच्या खिशात डॉक्टरची चिट्टी आढळून आल्याने त्यावर फक्त गावडे असे नाव दिसून आल्याने पोलिसांनी मािहती घेतली. मयत युवक हा बेडगा गावातील असल्याची माहिती मिळत आहे.

 
Top