उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 तालुक्यातील सारोळा येथे महाशिवरात्री व शिवजन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि.21) घेण्यात आलेल्या शिबिरात 30 भक्तांनी रक्तदान केले. तर खास महिलांसाठी सायं. 6 वा. आरोग्य मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
प्रारंभी या शिबिराचे आ. कैलास पाटील यांच्या हस्ते द्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच प्रशांत रणदिवे, सह्याद्री ब्लड बँकेचे संचालक शशिकांत करंजकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील, सुधाकर देवगिरे, नामदेव खरे, पोलीस पाटील प्रितम कुदळे, बाळासाहेब रणदिवे, चंद्रकांत मसे, वैभव पाटील, गजानन स्वामी, मारूती रणदिवे, विशाल बाकले, बाळासाहेब स्वामी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह्याद्री ब्लड बँकेच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. यासाठी महेश तोडकरी, अशोक गायकवाड, भिम मलकूनाईक, निकीता थोरात, मयुरी पौळ, शिवाजी जाधव यांनी परिश्रम घेतले.

 
Top