तेर/प्रतिनिधी-
चीन-भारत बुद्धीष्ट चे  कला व सांस्कृतिक संशोधनासाठी चीन देशातील बीजींग येथील सिंचीआन युनिव्हरसिटीची विद्यार्थीनी झँंग झिवोली हीने उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे 14 फेब्रुवारीला दौरा करून विविध पुरातन मंदीरे, स्थळांची पहाणी केली.
चीन देशातील बीजींद शहरातील सिचीआन युनिव्हरसिटीची विद्यार्थीनी झँंग झिवोली ही चीन-भारत देशातील बुद्धीष्ट चे कला व सांस्कृतिक या विषयावर संशोधन (पीएचडी) अभ्यासासाठी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे आली होती.तिच्या समवेत चीनच्या राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाच्या लींगाली होत्या. तेरमध्ये त्यानी कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालय,ञिविक्रम मंदीर, चैत्यग्रहाला भेट देऊन पहाणी केली. यावेळी मकरंद लंकेश्वर, रविंद्र मिनीक्षी मनोहर, सुनिल लोणकर उपस्थीत होते. 
 
Top