
माजी मंत्री आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचनेनंतर स्वप्नील पाटील व नितेव बेरी या वास्तुविशारदकांनी पुरातन सांस्कृतीने नटलेल्या तेर नगरीतील प्राचीन मंदीराची पहाणी केली.
यावेळी त्यांनी कै.रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय, त्रिविक्रम मंदीर , चैत्यगृह , उतरेश्वर मंदीर, संत गोरोबाकाका मंदीर, कालेश्वर मंदीर, पुरातन विटानी बांधलेले तिर्थकुंड, श्री.संत गोरोबाकाका यांच्या वाड्याची पहाणी केली. त्यानंतर वास्तुविशारद स्वप्नील पाटील , नितीश बेरी व पुणे येथील उद्योजक दिपक जगताप यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी, डॉ. आंबेडकर साखर कारखान्याचे संचालक शिवाजी नाईकवाडी ,पद्माकर फंड , बापू नाईकवाडी, विजयकुमार कांबळे, राजेंद्र उंबरे, सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.