कळंब/प्रतिनिधी -
तालुक्यातील शेतक-यांचे तुषार सिंचन व ठिबक सिंचनाचे व इतर अनुदान खात्यावर जमा होत नसल्याने शेतक-यांनी शिवसेनेच्या पदाधिका-यांकडे धाव घेतली. याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी दि.२७ फेब्रुवारी २०२० रोजी कृषी अधिकारी अशोक संसारे यांच्यासोबत तुषार सिंचन व ठिबक चे यासाठी मिळणारे अनुदान शेतक-यांना वेळेत न मिळाल्यामुळे ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिका-यांनी बैठक घेऊन चर्चा केली. लवकरात लवकर शेतक-यांना अनुदान याची रक्कम मिळवून देण्यास सांगितले. लागलीच कृषी खात्याची यंत्रणा कामाला लागली असुन येत्या दोन दिवसांत शेतक-याच्या खात्यावर रक्कम जमा होईल,असे कापसे यांनी सांगितले.
यावेळी अतिश पाटील, शहर प्रमुख प्रदीप मेटे, तालुका सरचिटणीस दीपक जाधव, युवा सेना तालुका अध्यक्ष आबासाहेब धोंगडे, किरण सहाने, हरिभाऊ कुंभार, आश्रुबा बिकड, विनोद तवले व हनुमंत नामदेव शिंदे हे उपस्थित होते.

 
Top