परंडा/प्रतिनिधी-
येथील सर्वधर्मीय समाजाचे सुफी संत हजरत खाँजा बद्रोद्दीन शहिद यांच्या उरुसास दि.3 मार्च पासुन सुरुवात होत असुन मुख्य संदल मिरवणुक दि.4 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता तहसिल कार्यालयातुन काढण्यात येणार आहे. ऊरुसानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
 दि.3 मार्च रोजी दर्गाह येथे रात्री 9 वा. महफीले समा , दि. 4 रोजी 5 वा. तहसिलदार यांच्या डोक्यावर फुलाची चादर देऊन संदल मिरवणुकीस आरंभ होणार आहे. त्यानंतर रात्री 10 वा. दर्गाह येथे मिरवणुक पोहचुन फातेहा खानी व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. दि.5 मार्च रोजी सकाळी 9 वाजता मंडई पेठ येथे तिन दिवस कलगीतुरा कार्यक्रम होणार आहे. दि.5 रोजी रात्री 9 वा. दर्गाह येथे नागपुरचे प्रसिद्ध कव्वाल अब्दुल हबीब अजमेरी यांचा कव्वालीचा कार्यक्रम, दि.6 रोजी जुन्या तहसिल कार्यालय ते मंडई पेठ पर्यंत बारा गाडया ओढने, टिपु सुलतान चौक आठवडा बाजार मैदानावर मुशायरा कार्यक्रम , दि. 7 मार्च रोजी सारेगम फेम गायक शर्मिला शिंदे पुणे यांचा भक्ती गीत, मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम, दि 8 मार्च रोजी रात्री वायज बयानचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी  लाभ घ्यावा, असे अवाहन उरूस कमेटीचे अध्यक्ष एजाज मुजावर, निसार मुजावर रफीक मुजावर, सलीम मुजावर, मलीक मुजावर, आकील मुजावर, शाहरुख मुजावर, साजिद मुजावर,  तनवीर मुजावर, हशम मुजावर, जावेद मुजावर , बबलु मुजावर, सल्लागार उमर  मुजावर, मुकीद मुजावर, रहिम मुजावर यांनी केले आहे.
 
Top