परंडा /प्रतिनिधी-
भाजपा परंडा तालुका व शहराच्या  वतीने विविध कार्यक्रमासह व मान्यवरांच्या हस्ते भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांचा वाढदिवसानिमित्त जंगी सत्कार करण्यात आला.
  या कार्यक्रमास विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आ. राणाजगजितसिंह पाटील, बार्शीचे आ.राजेंद्र राऊत, जि.प.अध्यक्षा आस्मिता कांबळे, सभापती दिगविजय शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, अॅड. खंडेराव चैारे, अॅड. सुभाष मोरे, अॅड. संतोष सुर्यवंशी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ चौधरी, राजकुमार पाटील, न.प. चे गटनेते सुबोधसिंह ठाकूर, सुखदेवे टोंपे, रमेश पवार, अॅड.गणेश खरसडे, शहर अध्यक्ष अॅड.जहीर चौधरी, महादेव वडेकर, आदम शेख, सचिन इंगोले, निशिकांत क्षिरसागर आदीची उपस्थितती होती.
भाजपा कार्यालाचे उद्घाटन
प्रारंभी भाजपा नूतन संपर्क कार्यलयाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अॅड. संतोष सुर्यवंशी यांनी प्रास्ताविकात आ.ठाकूर यांनी केलेल्या कामाची माहिती दिली. त्यानंतर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपल्या भाषणात आ.ठाकूर यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले.
रांगोळी स्पर्धा व रक्तदान  शिबीर
कल्याण सागर माध्यमिक विद्यालयात रांगोळी स्पर्धा संपन्न झाली. त्यानंतर उपजिल्हा रूग्णलयात कार्यकत्र्यांनी रूग्णंना फळे वाटप केले.  तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये ५१ जणांनी रक्तदान केले.  यावेळी  राजकीय, सामाजिक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच,नगरसेवक,   मित्रपरिवार तसेच नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top