परांडा /प्रतिनिधी-
नॅक मुल्यांकन करत असताना महाविद्यालयातील पायाभूत सुविधा पासून ते माजी विद्याथ्र्यांच्या सहयोगा पर्यंत सर्वच घटकांचा विचार करण्यात येतो, प्रतिपादन डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले.
परंडा येथे शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयामध्ये इंटरनल क्वालिटी अॅश्युरन्स सेल्स (आय क्यूए सी) च्या वतीने प्रिपरेशन अँड प्रेझेन्टेशन ऑफ पीपीटी फॉर नॅक या विषयावर एकदिवशीय दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा शुक्रवार २० रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. दीपा सावळे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, नॅक विभागाचे समन्वयक प्रा.विद्याधर नलवडे, आयक्यू एसीचे समन्वयक प्रा. दीपक तोडकरी उपस्थित होते. ही कार्यशाळा दोन सत्रांमध्ये संपन्न झाली.
 या कार्यशाळेचे समन्वयक प्रा.विद्याधर नलवडे, प्रा.डॉ.प्रशांत गायकवाड, प्रा.डॉ.महेशकुमार माने, प्रा.डॉ.अक्षय घुमरे प्रा.संतोष काळे आणि प्रा. डॉक्टर सचिन चव्हाण यांनी आयोजन केले होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. दीपा सावळे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.विद्याधर नलवडे यांनी केले. आयक्यूएसीचे समन्वयक प्रा.दीपक तोडकरी यांनी आभार मानले.
 
Top