उमरगा/प्रतिनिधी-
शहरातील कुंभारवाडा येथील परमेश्वरी देवी मंदिरातील दानपेटी व दागिन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. बुधवारी (दि.26) सकाळी सहाच्या सुमारास चोरीचा प्रकार उघडकीस आला.
याबाबतची माहिती अशी की, शहरातील कुंभारवाडा येथील परमेश्वरी देवी मंदिरात चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूच्या गेटचे कुलुप तोडून प्रवेश करून देवीचा एक किलो चांदीचा मुकुट व एक किलो चांदीची छत्री लंपास केली. तीन हजार किंमतीचे मनी मंगळसूत्रही लंपास केले. दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील साधारणत: चार हजार रूपये चोरट्यांनी नेले. रिकामी दानपेटी बाजूच्या मळ्यात टाकण्यात आली. चोरट्यांना एकुण 47 हजार रुपयाचा ऐवज पळविला असुन उत्तर बीटचे लक्ष्मण शिंदे, श्री. कांबळे यांनी पंचनामा करून मंदिराचे पुजारी तुकाराम कुंभार यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.