उस्मानाबाद/प्रतिनिधी-
पीक विमा संदर्भात विमा कंपन्यावर कारवाई करण्याची मांगणी श्री. कोंडाप्पा सदाशिव कोरे संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन  देण्यात आले आहे.
खरीप २०१९ प्रिमियम पोटी ४१ कोटी ४९ लाख ६५ हजार ३६६ रूपयाचा शेतक-यांनी विमा रक्कम भरलेली आहे. परंतू  यामध्ये उडीद-मुगास ठराविक ठिकाणी विमा कंपनीने विमा मंजूर केला आहे. तब्बल १ लाख ६९ हजार ८११ शेतक-यांना उडीद-मुगाचा विमा नाकारलेला आहे.तसेच जिल्हयातील सोयाबीन पिकला विमा दिलेला नाही कृषी अधिकारी, विमा कंपन्यानी व ठेकेदारांच्या संगनमताने शेतक-यांची आर्थिक लुट केली आहे. सोयाबीन पिकाच्या विम्याच्या मंजूरीबाबत कंपनीने अद्यापही निर्णय जाहीर केलेला नाही, साल २०१९ चा सोयाबीन या पिकाचा विमा वितरीत करण्याचे आदेश कंपनीला द्यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदनावर मारूती कारकर, रामजीवन बोंदर, कोंडाअप्पा कोरे, लक्ष्मण लांडगे, सतिश बोंदर, बालाजी वाघमारे, भारत जानराव आदीच्या स्वाक्ष-या आहेत.
 
Top