तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील अनेक ठिकाणच्या विद्युत डीपींची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असून, जो आहे तो कमी दबाने होत आहे. यामुळे शेतक-यांचे विद्युत साहित्य खराब होत असून, पाणी उपलब्ध असतानाही शेतीला देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
सत्ताधारी बदलले तरी शेतीला होणा-या वीज समस्याबाबत काहीही बदल झाला नसल्याचे दिसत आहे. तुळजापूर तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तलाव भरून विहिरींना मुबलक पाणी उपलब्ध आहे. ब-यास वर्षांनंतर रब्बी पिकांना पाणी उपलब्ध असल्याने शेतक-यांनी मोठया प्रमाणात हरभरा, ज्वारी व गहू या पिकांची लागवड केली होती. या भागातील एक-एका डीपीवर प्रमाणपेक्षा अधिक भार असल्याने पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे शेतक-यांना लोकवाटा जामा करून डीपीमध्ये नवीन फ्युज टाकावे लागत आहे. डीपी दुरूस्तीसाठी महावितरणाकडे वारंवार तक्रार करूनही लक्ष दिले जात नसल्याने शेतक-यांना जीवावर उदार होवून फ्यूज टाकून पाणी द्यावे लागते. सध्या सातत्याने विद्युत पुरवठा खंडीत होत असून हे कमी की काय म्हणून पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे मोटारी जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे शेतक-यांना आर्थिक फटका बसत आहे.त्यामुळे डीपी दुरूस्तीकडे प्राधान्याने लक्ष देवून शेतक-यांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतक-यांतून दिला जात आहे.