उस्मानाबाद/प्रतिनिधी-
पाकिस्तानी नागरिक, गायक, संगीतकार अदनान सामी यांना केंद्र सरकारने जाहीर केलेला पद्मश्री हा पुरस्कार रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारचा मनसेकडून निषेध करण्यात आला.
जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अदनान सामी यांचे वडील पाकिस्तानी वायु सेनेत पायलट होते ते हिंदूस्तान सोबत लढाईत शामिल होते असे न्युज चॅनेलने दाखवले आह,े अशा पाकिस्तानी गायकाला अतिशय महत्वाचा पद्मश्री पुरस्कार देण्यामागील कारण काय ? तसेच केंद्र सरकारने अदनान सामी हा महाराष्ट्रातील नागरिक म्हणून आहे म्हणून नोंद केलेली आहे. केंद्र सरकारने व राज्य सरकारने अदनान सामी हा महाराष्ट्रात कुठे राहतो ते सिध्द करावे,  अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिव्र अंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष अमरराजे कदम परमेश्वर, जिल्हा सचिव दादा कांबळे , तालुका उपाध्यक्ष तथा सरपंच मुरली देशमुख,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत शेटे,तुळजापूर शहर अध्यक्ष धर्मराज सावंत,विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष समीर शेख, निरंजन ठवळे, धिरज खोत,नारायण सांळुके आदी पदाधिकारी व कार्यकत्र्यांच्या स्वाक्ष-या आहेत.
 
Top