उस्मानाबाद/प्रतिनिधी
 कुटुंबाची काळजी घेणारी महिला कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. ती जागरूक व्हावी आणि समाजातही तिच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण होणे गरजेचे आहे. आहार, चांगल्या सवयी आणि वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीवर महिलांचे आरोग्य टिकणे आवश्यक आहे.महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे  आहे, असे प्रतिपादन डॉ.शहापुरकर यांनी केले.
  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून "महिलांचे स्वास्थ्य, त्यांच्या आरोग्यविषयक समस्या, पोषण आहार आणि व्यायाम" या विषयावर एक्स-ट्रिम फिटनेस क्लबने उस्मानाबादमधील डॉ.अभिषेक शहापूरकर यांचे चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एक्स-ट्रिम फिटनेस क्लबचे प्रा.मनोज डोलारे यांनी केले. सूत्रसंचालन संगीता पाठक तर आभार सौ.मानसी डोलारे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी शबाना शेख, स्वप्नाली पोळके, सौ.रंज पेठे आदींनी परिश्रम घेतले.
 
Top