उस्मानाबाद/प्रतिनिधी-
घोषणेच्या वर्षभरानंतरही सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वेमार्गाच्या एकरभर जमिनीचे भुसंपादनही होत नसताना सोलापूरचे रेल्वेचे स्थापत्य कार्यालय थेट भुसावळला हलविण्यात आले. यामुळे रेंगाळलेल्या या रेल्वे मार्गात आणखी एक स्पीड ब्रेकर निर्माण झाला असून या कामाला गती देण्यासाठी उपमुख्य अभियंता यांची नियुक्त करणे गरजेचे असल्यामुळे खा.ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वे विभागाचे सर व्यवस्थापक इतर अधिका-यांना फोनवर बोलून उपमुख्य अभियंत्यांची नियुक्ती करण्याची मांगणी केली आहे. या मागणीसाठी मंगळवारी आपण रेल्वे अधिका-यांच्या दारात वेळप्रसंगी उपोषणाला बसू असा इशारा ही दिला आहे.
उस्मानाबाद- सोलापूर रेल्वे मार्गाला गतीसाठी तीन महिन्यांपासून खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पाठपुरावा करत आहेत. परंतु, बैठकीत दिलेले शब्दही रेल्वेचे अधिकारी पूर्ण करत नसल्याने दिसत आहे. सुरुवातीला जमीन संपादन मोजणीसाठी चलन भरले जात नसल्याने काम थंड होते. याला गती दिल्यानंतर नोव्हेंबर अखेरपर्यंत 5 गावांची आणि मार्चअखेर सर्व गावांची मोजणी प्रक्रिया पूर्ण करून भूसंपादनाचेही काम सुरू होईल असे सांगितले. परंतु, जानेवारी अर्धा संपला तरी एकाही गावात जमीन संपादनासाठी मोजणीही झालेली नाही. आतापर्यंत खासदारांच्या उपस्थितीत तीन बैठका झाल्या. परंतु, रेल्वेचे अधिकारी गती घेण्यास तयार नसल्याचेच दिसत आहे. त्यातच रविवारी (दि.19) उस्मानाबादेत झालेल्या बैठकीत ही प्रक्रिया राबविणारे सोलापूरचे कार्यालयच भुसावळला हलविल्याची माहिती समोर आली. यावेळी खासदार ओमराजेंनी रेल्वेचे भुसावळला स्थलांतरीत करण्यात आलेले कार्यालय सोलापूरलाच ठेवण्याबाबत जनरल मॅनेजर मनोज शर्मा यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. तसेच येथे स्वतंत्र उपअभियंता पद निर्माण करणे, जिल्ह्यासाठी एक नोडल ऑफीसर यांची नेमणूक करण्याबाबत सुचना केल्या. तसेच या कामाला गती देण्यासाठी आणखी काय करावे लागेल याचीही माहिती घेतली. यावेळी आमदार कैलास पाटील, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे रेल्वेचे अधिकारी अभियंता वाय. व्ही.राव-भुसावळ, नुुरूस सलाम, शाखा अभियंता आदींची उपस्थिती होती.
 
Top