उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मार्केटिंगच्या आजच्या युगात विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापनचा मंत्र गरजेचा आहे तसेच नौकरी मिळविणे, करिअर घडविण्याचे तंत्र आत्मसात करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उप-परिसर येथील व्यवस्थापन शास्त्र विभागात  करिअर कौन्सलिंग सेंटर  सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती विभागाचे संचालक डॉ सुयोग अमृतराव यांनी दिली.
   या केंद्राचे उद्घाटन प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमास उपपरीसर मंडळ व अधिसभा दस्य डॉ. गोविंद काळे, उप-परिसर संचालक डॉ. प्रशांत दीक्षित, विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव, उपकुलसचिव विष्णू कराळे, डॉ नितीन पाटील, डॉ रमेश चौगुले, डॉ जे ए कुलकर्णी, डॉ जे एस शिंदे आदी उपस्थित होते. तंत्रशिक्षण विभागामार्फत 2020 वर्षातीलप्रवेशा बाबत नियमावली, तारखा व प्रक्रिया जाहीर झाली आहे. उस्मानाबाद परिसरातील विद्यार्थांना करिअरविषयी माहिती, कागदपत्र अपलोड करणे, तारखा, प्रक्रिया, नियमावली व ईतर माहिती या सेंटर मार्फत मिळणार आहे. ही प्रक्रिया जानेवारी ते प्रवेश होईपर्यंत साधारण 6 महिने चालत राहते. त्यामुळे इच्छुक विद्यार्थांचे नुक्सान होऊ नये तसेच व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा प्रचार, प्रसार व उपयोग या बाबतही सदरील सेंटर कार्य करेल.  तसेच एमबीए उत्तीर्ण झाल्यावर कोणत्या संधी आहेत याबद्दलही मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी डॉ. विक्रम शिंदे, प्रा. सचिन बस्सैये, प्रा. वरून कळसे हे प्रयत्नशील आहेत. याचा पहिला टप्पा म्हणून 10 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश परीक्षेस आर्ज करण्याचा कालावधी आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत अधिक माहिती साठी विद्यापीठ उप-परिसर येथील व्यवस्थापन शास्त्र विभागात भेट द्यावी असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे. 
 
Top