उस्मानाबाद/प्रतिनिधी-
पालकमंत्री  शंकरराव गडाख उस्मानाबाद जिल्हा दौरावर आल्यानंतर  मनसेच्या वतीने जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनाविविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शेतक-यांचा सात बारा कोरा करावा, आपत्तीधारक शेतक-यांनाना सरसकट 25000 रूपये मदत करावी, स्थानिक युवकांच्या हाताला रोजगार नसल्यामुळे जिल्हातील युवक मुंबई- पुणे येथे रोजगारासाठी गेले आहेत व जात आहेत हे थांबविण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा व अन्या मागण्यांचे उल्लेख करण्यात आला आहे. यावेळी धर्मराज सावंत, शिक्षक सेनेचे नेते बबनजी वाघमारे, धिरज खोत, सौरभ देशमुख, तन्मय वाघमारे अदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top