उस्मानाबाद/प्रतिनिधी-
९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरात १०,११,१२ जानेवारी २०२० रोजी संपन्न होत असून या संमेलनासाठी १ हजार प्रसिध्द लेखक, कवी, साहित्यीक येणार आहेत. जिल्हयात व परिसरात साहित्य संमेलनाविषयी माहिती व्हावी, यासाठी ३ जानेवारी रोजी उमरगा तालुक्यातील अचलबेट येथून साहित्य ज्योत निघणार आहे. साहित्य ज्योत पुर्ण जिल्हयात फिरून साहित्य संमेलनाचा जागर करणार आहेत, अशी माहिती स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
उस्मानाबादेत होणा-या साहित्य संमेलनासाठी जय्यत तयारी पुर्णत्वाच्या टप्यावर आहे. जिल्हयात साहित्य संमेलना विषयी माहिती व्हावी, यासाठी अचलबेट येथून निघालेली साहित्य ज्येात उमरगा, लोहारा, तुळजापूर, येडाशी, तडवळा, ढोकी, गोविंदपूर, भाटशिरपूर, डिकसळ, कळंब, ईटकूर, वाशी, भूम, सोनारी, परंडा, बार्शी व उस्मानाबाद येथे येणार आहे. ही ज्योत ४ जानेवारी रोजी उस्मानाबादेत आल्यानंतर ज्या ठिकाणी साहित्य संमेलन होणार आहे. त्या ठिकाणी ही साहित्य ज्येात संमेलन संपन्न होई पर्यंत प्रज्वलीत राहणार आहे. या साहित्य ज्योतीची जबाबदारी उमेशराजे निंबाळकर यांनी घेतलेली आहे. त्याच्यासोबत ४० गाडयांचा ताफा राहणार आहे.
मान्यवर येणार
साहित्य संमेलनाच्या जागेला संत गोरोबा काका साहित्य नगरी हे नाम दिले असून साहित्य संमेलनाचे उद्घाटन मडपातील क्रमाक १ मध्ये पद्मश्री ना.धो महानोर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची उपस्थिती असणार आहे. तीन दिवस चालणा-या साहित्य संमेलनामध्ये प्रतिभा रानडे, इंद्रजीत भालेराव, डॉ.अरूणा देढे, बाळकृष्ण कवठेकर, डॉ. दासू वैद्य, सारंग दर्शन, अरूण म्हात्रे, डॉ.सुषमा करोगल, डॉ.कैलास अंभुरे, सतिश तराळ, विलास सिंदगीकर, श्रीराम शिधये, डॉ.दत्ता घोलप, डॉ.केशव तुपे, डॉऋषीकेश कांबळे आदी मान्यवर साहित्यीक येणार आहेत.मुख्य मंडात उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. येथील व्यासपीठाला शाहीर अमर शेख यांचे नाव देण्यात आले आहे. तर कवी संमेलन होणा-या व्यासपीठाला दत्तु अप्पाजी तुळजापूरकर हे नाव देण्यात आले आहे. तर परिसंवाद व सांस्कृतीक कार्यक्रम होणा-या मंडपातील दोन नंबर व्यासपीठाला सेतूमाधव पगडी साहित्यमंच नाव देण्यात आले आहे.
साहित्य संमेलनानिमित्त गावकथा व संगित देव बाभळी हे दोन सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहेत. समारोप कार्यक्रमात प्रसिध्द साहित्यीक रा.र.बोराडे सर येणार असून त्यादिवशीच बालकुमार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवस चालणा-या साहित्य संमेलनास देश व राज्यातून १ लाख लोक भेट देतील असा अंदाज आहे. या पत्रकार परिषदे प्रसंगी रवींद्र केसकर, प्रशांत पाटील, डॉ.अभय शहापूरकर, प्राचार्य जयसिंग देशमुख , माधव इंगळे, बालाजी तांबे, राजेंद्र अत्रे, अशिष मोदाणी, संजय मंत्री, देवीदास पाठक,अग्निवेश शिंदे, आदी उपस्थितीत होते. यावेळी साहित्य संमेलनाच्या प्रसिध्दी माध्यम समन्वय समितीमध्ये मोतीचंद बोदमुथा, एस.ए.सय्यद, राजाभाऊ वैद्य, कमलाकर कुलकर्णी, शिला उंबरे यंाची निवड करण्यात आली.