उस्मानाबाद/प्रतिनिधी-
समाज सुस्कांरीत व्हावा व देश हितासाठी राजस्थानी समाज सर्व जाती धर्मातील बालकांसाठी २०० बाल संस्कार केंद्र सुरू करणार असल्याची माहिती, माहेश्वरी सभेचे प्रदेशाध्यक्ष श्रीकिशन भन्साळी ने पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माहेश्वरी सभेचे प्रदेश सचिव मदनलाल मिनीयार हे उपस्थित होते. येत्या तीन वर्षांत राज्यात हे केंद्र सुरू करणार आहे. येत्या एप्रील २०२० मध्ये कांही जिल्हयात हे केंद्र सुरू होणार आहे. माहेश्वरी समाजाच्या वतीने ४ जानेवरी २०२० रोजी उस्मानाबादेत सत्काराचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास उद्योगपती डॉ.संजय मालपानी, हिरालाल मालु, खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.राणाजगजितसिंह पाटील, आ.कैलास घाडगे पाटील, माहेश्वरी महासभेचे सुरेंद्रजी मानधने, अशोक बंग, सत्यनारायण लाहोटी, रामनारायण काब्रा, ब्रिजलाल मोदाणी आदी उपस्थित राहणार आहेत.
पुढे माहिती देताना भन्साळी म्हणाले की, माहेश्वरी समाजातील आर्थिकदृष्टया कमजोर, लोकांना संघटनेच्या वतीने आर्थिक मदत केली जाते. त्याचप्रमाणे असहाय्य, विधवा महिलांनाही पुर्ण मदत करण्यात येते. शिक्षण, आरोग्य, व्यापार यासाठीही आर्थिकदृष्टया दुर्बल समाजातील लोकांना मदत केली जाते. यासाठी ओमकारनाथ मालपानी ट्रस्ट, आदित्य विक्रम बिर्ला ट्रस्ट, बांगड माहेश्वरी ट्रस्ट, बद्रीलाल सोनी शिक्षा ट्रस्ट, कोठारी बंधु ट्रस्ट आदी विविध ट्रस्टच्या माध्यमातून ही मदत केली जात असल्याचे सागितले. यावेळी माहेश्वरी समाजाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष गिराधारी चांडक यांनी ४ जानेवारी रोजी उस्मानाबाद मधील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे भन्साळी व मिनीयार यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

 
Top