लोहारा/प्रतिनिधी
धान फाऊंडेशन अंतर्गत आधार कलांजियम लोकसंचलीत साधन केंद्र लोहारा यांच्यावतीने शहरात महिलांचा पद यात्रासह भव्य महिला  मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पद यात्रेची सुरुवात निवासी नायब तसीलदार रंजीत शिराळकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आली. या पदयात्रेत 22 विविध गावातील 600 महिलांनी भाग घेतला होता. यावेळी महिलांनी बचत गटविषयी विविध घोषणाबाजी केली.
कार्यक्रमाची प्रस्तावना सोलापूर येथील विभागीय अधिकारी मनीषा वाघमारे यांनी केली. या कार्यक्रमास प्रमुख म्हणुन बसय्या स्वामी, बालाजी मक्तेदार, सहायक पोलिस उपनिरीक्षक देशभूषन चाकवते, तद्यकविकी सरपंच उर्वशी ठाकुर, मयुर मिसाळ आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आलेल्या विजेत्या विद्यार्थांना बक्षीस वितरण करण्यात आले. व तसेच बचत गटातील महिलांना प्रथमोपचार पेटी चे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतूल पवार, सागर झुंजारे, विशाल पवार, लोहरा  कार्यकर्त्या आर.एन. यादव, व्ही.जी.गायकवाड,  एम.के. शेख, आर.डी. वाघमारे, एल.एस.फुलसुंदर, अदिंनी, परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकीता कोळगे व अनिता भोरे यांनी केले. तर आभार  विशाल पवार यांनी मानले.
 
Top