वाशी/प्रतिनिधी-
कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या  जयंतीनिमित्त महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व श्री भगवंत ब्लड बँक बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने दि-24 जानेवारी रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 91 जणांनी रक्तदान केले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शारदा मोळवणे, प्रा.विश्वास चौधरी, प्रा.राजाभाऊ बनसोडे,  प्रा.डॉ.बालाजी देवकते, प्रा.डॉ अरुण गंभिरे, प्रा.डॉ.रविंद्र कठारे, प्रा.डॉ.अनिल कट्टे, प्रा.शाम डोके, प्रा,राम जाधव, प्रा.महादेव उंदरे, प्रा.शहाजी चेडे, प्रा.हनुमंत काळे, प्रा.डॉ.अभिमान माने, श्री भगवंत ब्लड बँक, बार्शी यांचे गणेश जगदाळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजाभाऊ बनसोडे, यांनी केले. सुत्रसंचलन प्रा.विश्वास चौधरी, तर आभार प्रा.डॉ.बालाजी देवकते यांनी मानले.
या शिबिरास शहरातील ग्रामस्थ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी विद्यार्थी-विध्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top