भूम/प्रतिनिधी-
मराठवाड्यातच नव्हेतर पूर्ण देशात ही उस्मानाबाद जिल्हयास दुष्काळी व मागासलेला जिल्हा हा शिका लागून ही या जिल्ह्यातील शेतक-यांना सोयाबीन पीक विमा मिळत नाही, असे असतानाही या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कुंभकर्णाच्या झोपेत आहेत, त्यांना जाग आणण्यासाठी मी आज येथे आलो आहे. शेतक-यांना सात सातबारा-कोरा करण्यासाठी स्वाभिमानी संघटना पुर्ण ताकद लावणार, असे प्रतिपादन माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.
दि 23 जानेवारी रोजी भूम तालुक्यातील गणेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शाखेचे उद्घाटन राजु शेट्टे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलत असताना म्हणाले, विधानसभा निवडणुकी दरम्यान शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेस या तीनही पक्षाच्या वतीने शेतक-यांना सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते निवडणूक होऊन तीन महिण्याचा कालावधी झाला सांगा किती लोकांचा सात बारा कोरा झाला. मध्यनंतरी दुष्काळ पडला होता, त्या काळात केवळ या शेतातच पीक नव्हते तर पीक कर्ज मिळणार कोठून आणी या शासनाने घोषणा केली की 30 सप्टेंबर आधी ज्या शेतक-यांनी पीक कर्ज घेतले असेल या शेतक-यांचे पीक कर्ज माफ केले जाईल संपूर्ण महाराष्ट्रातून 30 टक्के शेतक-यांनी पीक कर्ज घेतले असून यातही सांगली, कोल्हापूर या भागातील शेतक-यांनी 70 टक्के पीक कर्ज घेतले आहे. म्हणजे उर्वरीत 30 टक्के मराठवाडा व महाराष्ट्रातील शेतक-यांनी पीक कर्ज घेतले होत.े या प्रमाणे हिशोब केल्यास केवळ 2 ते 3 टक्के शेतकरी हे मराठवाड्यातील थकीत आहेत यामुळे ही पीक कर्ज माफी योजना केवळ हातावर मोजण्या इतक्या लोकांना मिळाली आहे. अशाने शेतक-यांना सातबारा कोरा होणार आहे का? परंतु या पुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. यावेळी जिल्हा अध्यक्ष रवींद्र इंगळे, तानाजी पाटील, उपध्यक्ष धनाजी पेंडे, मंगेश अजबे, भूम तालुकाध्यक्ष अनंता डोके, परांडा तालुकाध्यक्ष शिवाजी ठवरे, अमृत भोरे, बिभीषण भैरट व भाऊसाहेब मुंडे उपस्थित होते.